Sameer Amunekar
थंडीत त्वचा कोरडी होते, पण गुलाबपाणी लावल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि चेहरा मऊ दिसतो.
गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने करतं आणि रक्ताभिसरण वाढवून नैसर्गिक ग्लो आणतं.
थंडीमुळे किंवा कोरड्या वाऱ्यामुळे होणारी चुरचुर, खाज कमी करण्यासाठी गुलाबपाणी उपयोगी ठरतं.
बाजारातील केमिकलयुक्त टोनरऐवजी गुलाबपाणी नैसर्गिक टोनर म्हणून वापरता येतं, ज्यामुळे रोमछिद्र स्वच्छ राहतात.
दिवसातून २-३ वेळा गुलाबपाण्याचा स्प्रे केल्याने त्वचेला ताजेपणा आणि ओलावा दोन्ही मिळतात.
थंडीत झोपेची कमतरता किंवा कोरडेपणामुळे आलेले डार्क सर्कल्स गुलाबपाणी लावल्याने हलके होतात.
मेकअप करण्याआधी गुलाबपाणी लावल्याने त्वचा हायड्रेट होते आणि मेकअप जास्त वेळ टिकतो.