Sameer Amunekar
थोडं गायीचं तूप आणि चिमूटभर हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावा. ही मिश्रण त्वचेला ओलावा देते आणि चमक वाढवते.
एक चमचा मध आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर १५ मिनिटं ठेवा. याने त्वचेतील मृत पेशी दूर होतात आणि त्वचा उजळते.
झोपण्यापूर्वी काही थेंब नारळाचे तेल हलक्या हाताने मालिश करा. त्वचा मऊ, गुळगुळीत आणि तेजस्वी राहते.
बेसनात दुध घालून हलका स्क्रब तयार करा. आठवड्यातून दोनदा वापरल्यास त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो.
गुलाबपाणी व कोरफड जेल एकत्र करून टोनर म्हणून वापरा. हे त्वचेला ताजेतवाने ठेवते आणि नैसर्गिक ग्लो देते.
हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने त्वचा कोरडी पडते. पुरेसं पाणी प्या आणि आहारात ड्रायफ्रूट्स, तूप व फळांचा समावेश करा.
हिवाळ्यातही UV किरणे त्वचेवर परिणाम करतात. घराबाहेर पडताना सौम्य सनस्क्रीन वापरा.