Sameer Amunekar
थंडीत जास्त वेळा चेहरा धुतल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं आणि त्यामुळे पिंपल्स वाढू शकतात.
त्वचा कोरडी राहिल्यास तेलग्रंथी जास्त तेल तयार करतात, ज्यामुळे पिंपल्स येतात. हलकं, तेलमुक्त मॉइश्चरायझर वापरा.
फार घट्ट किंवा तेलकट क्रीम्स वापरल्यास छिद्रं बंद होतात आणि पिंपल्स वाढतात. “non-comedogenic” उत्पादने निवडा.
थंडीत पाणी कमी प्यायल्याने शरीर आणि त्वचा दोन्ही कोरडी होतात. दररोज पुरेसं कोमट पाणी प्या.
तळलेले, मसालेदार पदार्थ कमी करा. फळं, भाज्या आणि व्हिटॅमिन-E व झिंकयुक्त पदार्थ खा.
धूळ आणि तेल जमा झाल्याने जीवाणू वाढतात, ज्यामुळे पिंपल्स वाढू शकतात. आठवड्यातून २ वेळा धुवा.
हातांवरील जंतू त्वचेवर गेल्यास पिंपल्स वाढतात. चेहऱ्याला हात लावण्याची सवय कमी करा.