Sameer Amunekar
अति गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक ओलावा काढून टाकते. त्यामुळे त्वचा अधिक कोरडी, निस्तेज आणि खाजरी दिसते.
फेसवॉशनंतर खूप वेळ थांबून मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा पटकन कोरडी पडते. म्हणून ओलसर त्वचेवर लगेच मॉइश्चरायझर लावा.
हिवाळ्यात सूर्यकिरण कमी असले तरी UV किरणे तीव्रच असतात. सनस्क्रीन न वापरल्यास त्वचा काळवंडते आणि पिगमेंटेशन वाढू शकते.
कोरड्या हवेमुळे त्वचा आधीच नाजूक होते. अशावेळी जास्त स्क्रब केल्यास लालसरपणा, सोलणे आणि रॅशेस येऊ शकतात.
ओठ पटकन कोरडे पडतात. लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली न लावल्यास ओठ फुटणे, कडांवर रक्त येणे यासारख्या समस्या वाढतात.
हिवाळ्यात धूळकण त्वचेवर चिकटतात. मेकअप न काढल्यास pores ब्लॉक होऊन पिंपल्स आणि निस्तेजपणा वाढतो.
थंडीमध्ये पाण्याची तहान कमी जाणवते. पण शरीरात पाण्याची कमतरता झाली तर चेहरा कोरडा दिसतो. म्हणून दिवसाला किमान ७–८ ग्लास पाणी प्या.