Sameer Amunekar
सिंधुदुर्गातील मालवणपासून २० किमी अंतरावर असलेलं प्राचीन कुणकेश्वर शिवमंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असून याला “दक्षिणेचं काशी” म्हणतात.
समुद्रकाठी वसलेल्या या मंदिराचा इतिहास सुमारे एक हजार वर्षे जुना असून महाशिवरात्रीला येथे लाखो भाविकांचा ओघ वाढतो.
मंदिराच्या समोरच विस्तारलेला अरबी समुद्र, लाटांचा मधुर आवाज आणि शांत वातावरण भाविकांना व प्रवाशांना एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव देतात.
हिरवीगार टेकड्या, स्वच्छ समुद्र आणि रुंद किनारा यामुळे हे ठिकाण एक उत्तम नैसर्गिक पर्यटन स्थळ ठरते.
गर्दीपासून दूर, निवांत विश्रांती घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी कुणकेश्वर हा परिपूर्ण पर्याय आहे.
संध्याकाळी येथील सूर्योस्त अप्रतिम दिसतो. शांत किनाऱ्यावर फेरफटका मारणं हे येथील पर्यटकांचं खास आकर्षण आहे.
ऑक्टोबर ते मार्च हा प्रवासासाठी उत्तम काळ. धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग आणि समुद्रसौंदर्याचा आनंद एकाच ठिकाणी घेता येतो.