Sameer Amunekar
हिवाळ्यात त्वचा पटकन कोरडी पडते, त्यामुळे मॉइस्चरायझर दिवसातून किमान दोनदा वापरा. हायल्युरॉनिक अॅसिड, शेया बटर किंवा स्क्वॅलेन असलेले क्रीम उत्तम परिणाम देतात.
हार्श आणि फोमी क्लीनर त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकतात. त्यामुळे हिवाळ्यात सौम्य, क्रीम-बेस्ड किंवा जेल-बेस्ड फेसवॉश वापरून त्वचा कोरडी होऊ देऊ नका.
हिवाळ्यात मृत त्वचा थर वाढल्यामुळे चेहरा निस्तेज दिसू शकतो. आठवड्यातून एकदा सौम्य स्क्रब करा किंवा केमिकल एक्सफोलिएशनसाठी AHA/BHA सिरीमचा वापर करा.
रोजहिप, जोजोबा किंवा आर्गन तेलासारखी हलकी फेस ऑइल्स त्वचेला हेअलिंग आणि नैसर्गिक ग्लो देतात. रात्रीच्या स्किनकेअरमध्ये हे ऑइल समाविष्ट करा.
पाणी कमी पिणे ही हिवाळ्यातील सामान्य समस्या आहे. शरीरात पुरेसा हायड्रेशन असेल तर त्वचेतही ग्लो दिसतो. पाणी, नारळपाणी आणि सूप यांचे प्रमाण वाढवा.
हिवाळ्यात सूर्यप्रकाश मऊ असला तरी त्यातील UV किरण त्वचेचे नुकसान करतात. त्यामुळे किमान SPF 30 असलेला ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन दररोज लावा.
हनी + अलोवेरा जेल, दही + हळद किंवा केशर-मिल्क फेसपॅक हे घरगुती उपाय त्वचेला नैसर्गिक चमक देतात. आठवड्यातून 2 वेळा वापरा.