Sameer Amunekar
एकाच जाड कपड्याऐवजी इनर, स्वेटर आणि जॅकेट असे थरांमध्ये कपडे घातल्यास शरीराची उष्णता टिकून राहते.
थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्यायल्याने शरीर आतून गरम राहते आणि पचनसंस्थाही चांगली राहते.
सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्याने शरीराला नैसर्गिक उष्णता मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
सूप, वरण, गरम दूध, आलं, तुळस यांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ शरीर गरम ठेवण्यास मदत करतात.
हलका योग, चालणे किंवा स्ट्रेचिंग केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरात उष्णता निर्माण होते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, त्यामुळे मॉइश्चरायझर किंवा तेलाचा नियमित वापर करा.
दररोज 7-8 तासांची झोप घेतल्यास शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि आजार दूर राहतात.