Sameer Amunekar
मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी थरांमध्ये कपडे घाला. बनियन, स्वेटर, मफलर आणि टोपी वापरा. हातपाय झाकून ठेवा.
थंडीत मुलं कमी पाणी पितात, त्यामुळे गरम किंवा कोमट पाणी देऊन शरीरातील ओलावा टिकवा.
मुलांच्या आहारात सूप, डाळी, गाजर, पालक, हळद-दूध यांसारखे पौष्टिक पदार्थ वाढवा. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे सौम्य बेबी मॉइश्चरायझर किंवा नारळ तेलाने मसाज करा.
खोलीत हवा खेळती ठेवा पण थंड वारा येणार नाही याची काळजी घ्या. गरज असल्यास ब्लँकेट आणि हीटरचा योग्य वापर करा.
मुलांच्या नाकाला किंवा छातीला हलकं वाफ द्या, तसेच मध आणि हळद यांचा वापर करा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार.
थंडीमुळे जंतुसंसर्ग वाढतो. मुलांचे हात नियमित धुवायला लावा आणि वापरलेले रुमाल, कपडे वेळोवेळी स्वच्छ धुवा.