Sameer Amunekar
हिवाळ्यात माती लवकर कोरडी पडत नाही, त्यामुळे आठवड्यातून 1–2 वेळा हलकेसे पाणी पुरेसे असते. सतत ओल ठेवू नका.
वरची 1–2 इंच माती कोरडी झालेली दिसली तरच पाणी द्या. माती ओलसर असल्यास पाणी देणे टाळा.
थंड हवेमुळे रात्री पाणी दिल्यास माती जास्त वेळ ओली राहते. त्यामुळे पाणी सकाळी 8–10 वाजता देणे उत्तम.
कुंडीतील झाडे लवकर कोरडी पडतात, पण हिवाळ्यात तरीही पाणी जास्त देऊ नका. कुंडीला योग्य ड्रेनेज असणे आवश्यक.
ज्या झाडांची हिवाळ्यात पाने गाळतात (डिसिड्युअस), त्यांना वाढ मंदावल्यामुळे फार कमी पाणी लागते.
वारंवार पाणी देण्याऐवजी कुंडीवर मल्च (कोरडी पाने/भुसा) घालून मातीतील ओल टिकवा. यामुळे पाणी कमी खर्ची पडते.
हिवाळ्यात जास्त पाणी दिल्यास मुळांवर सड येऊ शकते. हे झाडांसाठी सर्वात घातक असते.