Akshata Chhatre
हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे ओठांची नैसर्गिक नमी कमी होते, ज्यामुळे ओठ फाटतात आणि त्यांचा गुलाबी रंग फिका पडतो.
गुलाबाच्या पाकळ्या, मध आणि मलाई एकत्र करून चांगली बारीक करून जाड पेस्ट बनवा. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर याची जाड लेअर लावा. फ्रिजमध्ये ३ दिवसांपर्यंत साठवता येतो.
गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुऊन, पाणी सुकवून घ्या. पाकळ्यांची जाड पेस्ट बनवून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरा, त्यात १ चमचा ग्लिसरीन मिसळा.
दिवसातून २-३ वेळा आणि रात्री झोपताना लावा. तुम्ही या बामचे क्यूब्स फ्रिजरमध्ये गोठवून ओठांवर हळू हळू चोळल्यास रक्त परिसंचरण सुधारते आणि ओठांचा रंग गुलाबी होतो.
गुलाबाच्या पाकळ्या नैसर्गिक हीलिंग बाम म्हणून काम करतात आणि ग्लिसरीन ओठांना खोलवर नमी प्रदान करते आणि एक्सफोलिएट करते.
मलाई ओठांचा कोरडेपणा कमी करते, तर दुसऱ्या बाजूला मध ओठांचा काळेपणा दूर करण्यास मदत करतो.
बाजारातील महागड्या उत्पादनांऐवजी, हे नैसर्गिक उपाय ओठांना खोलवर पोषण देतात आणि त्यांचा नैसर्गिक गुलाबी रंग टिकवून ठेवतात.