Akshata Chhatre
हिवाळ्यातील थंड आणि कोरडी हवा त्वचेचा नैसर्गिक ओलावा हिरावून घेते.
लग्नाच्या दिवशी त्वचा चमकदार आणि निर्दोष दिसावी, यासाठी २ ते ३ महिने आधीपासूनच या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
चेहऱ्यावरील घाण आणि मेकअप खोलवर साफ करण्यासाठी क्लींजिंग करणे कधीही विसरू नका. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून २ वेळा एक्सफोलिएशन जरूर करा.
एक्सफोलिएशननंतर त्वचेच्या प्रकारानुसार योग्य टोनर लावा. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी नेहमी मॉइश्चरायझर लावा. हिवाळ्यातही त्वचेचे संरक्षण करण्यासाठी SPF 30 किंवा त्याहून अधिक सनस्क्रीन लावा.
ओठ आणि हातांच्या काळजीसाठी योग्य क्रीमचा वापर करा.
जर तुम्हाला रासायनिक उत्पादने वापरायची नसतील, तर कोरडी त्वचा दूर करण्यासाठी गुलाबजल आणि ग्लिसरीन यांचे मिश्रण दररोज चेहऱ्यावर लावा. यामुळे कोरडेपणा दूर होऊन त्वचेत चमक येते.