Sameer Amunekar
हिवाळ्यात आठवड्यातून किमान दोनदा कोमट नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह तेलाने डोक्याला हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांना पोषण मिळतं आणि केस गळती कमी होते.
अतिशय गरम पाणी केसांचे नैसर्गिक तेल काढून टाकतं. त्यामुळे कोमट किंवा थंडसर पाण्याने केस धुणे योग्य.
केस कोरडे होऊ नयेत म्हणून सल्फेट-फ्री शॅम्पू आणि डीप कंडिशनिंग करणारा कंडिशनर वापरा. आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावा.
दररोज केस धुतल्याने केसातील नैसर्गिक आर्द्रता कमी होते. दोन ते तीन दिवसांच्या अंतरानेच केस धुवा.
ओले केस कमकुवत असतात. त्यामुळे ते वाळल्यानंतरच विंचरा, अन्यथा केस तुटतात आणि फाटतात.
प्रथिने, लोह, ओमेगा-३ आणि व्हिटॅमिन ई युक्त आहार (अंडी, सुका मेवा, हिरव्या भाज्या, दही) केस मजबूत आणि चमकदार ठेवतो.
बाहेर पडताना केसांना थंड वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी स्कार्फ, कॅप किंवा हूडी वापरा. यामुळे केसांतील ओलावा टिकतो.