Korean Lip Care Hacks: हिवाळ्यात ओठ फाटतात? ओठ मऊ आणि गुलाबी ठेवण्यासाठी 7 जबरदस्त कोरियन हॅक्स

Manish Jadhav

कोमट पाण्याचा शेक द्या!

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात कापूस किंवा हॅन्की भिजवून ओठांवर काही सेकंद ठेवा; यामुळे ओठांवरची डेड स्किन (मृत त्वचा) अगदी सहज निघून जाते.

korean lip care hacks | Dainik Gomantak

मधाचा हलका मसाज करा!

स्वच्छ बोटावर थोडेसे शुद्ध मध घेऊन हलक्या हाताने ओठांवर चोळा. मधामुळे ओठांची जळजळ थांबते आणि ओठ नैसर्गिकरीत्या मऊ होतात.

korean lip care hacks | Dainik Gomantak

साखरेचा घरगुती स्क्रब वापरा!

अर्धा चमचा साखर आणि त्यात थोडेसे तूप किंवा खोबरेल तेल मिसळून ओठांवर अगदी हलक्या हाताने 1 मिनिट फिरवा; ओठांचा कोरडेपणा नाहीसा होईल.

korean lip care hacks | Dainik Gomantak

ओठांना जीभ लावणं टाळा आणि पाणी प्या!

दिवसभर भरपूर पाणी प्या आणि कोरड्या ओठांवर वारंवार जीभ फेरण्याची सवय अजिबात ठेवू नका, यामुळे ओठ आणखी जास्त फाटतात.

korean lip care hacks | Dainik Gomantak

कोरफड जेल लावा!

रात्री झोपताना ओठांवर थोडेसे कोरफड जेल लावून हलके मसाज करा. यामुळे ओठांना भरपूर ओलावा मिळतो आणि ओठ टवटवीत राहतात.

korean lip care hacks | Dainik Gomantak

खोबरेल तेल किंवा तूप लावा!

तुमच्याकडे लिप बाम नसेल, तर रात्री झोपण्याआधी ओठांवर गाईचे तूप किंवा शुद्ध खोबरेल थेंबभर तेल नक्की लावा.

korean lip care hacks | Dainik Gomantak

ओठांवर व्हॅसलीन लावा!

वर दिलेले उपाय केल्यानंतर ओठांवर व्हॅसलीन किंवा तुमच्या आवडीचा लिप बाम लावा. हे ओठांवर झाकणासारखे काम करुन ओलावा बाहेर जाऊ देत नाही.

korean lip care hacks | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा