Sameer Amunekar
हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास जास्त होतो. दूधात खजूर मिसळल्याने इम्युनिटी नैसर्गिकरित्या मजबूत होते.
थंड हवेत शरीर पटकन थंड पडते. खजूर शरीरात उष्णता निर्माण करून ऊर्जा देतो आणि दिवसभर ताजेतवाने ठेवतो.
दूधातील कॅल्शियम + खजूरमधील नैसर्गिक मिनरल्स एकत्र येऊन हाडांची ताकद वाढवतात आणि सांधेदुखी कमी करण्यात मदत करतात.
हिवाळ्यात पचनसंस्था मंदावते. खजूर पदार्थ पोट गरम ठेवतो, पचन सुधारतो आणि फुगलेपणा कमी करतो.
दूध आणि खजूर तत्वातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेतील ओलावा टिकवतात, ज्यामुळे चेहरा मऊ आणि ग्लोईंग दिसू लागतो.
सर्दी, खोकला, घसा बसणे, शरीरदुखी यांसारख्या समस्यांपासून संरक्षण देण्यासाठी ही जोडी (दूध + खजूर) उत्तम उपाय आहे.
उबदार दूधात खजूर मिसळून घेतल्यास शरीर रिलॅक्स होते आणि झोप उत्तम लागते.