Vengurla Dutch Factory: छत्रपती शिवरायांनी दिलेला अभय! वेंगुर्ल्याची 'डच वखार', जिथे अरब व्यापारीही आणायचे माल

Sameer Amunekar

डच वखार

वेंगुर्ले येथील डच वखार १६३७ साली डच व्यापाऱ्यांनी विजापूरच्या आदिलशहाकडून परवानगी घेऊन बांधली असून ती मसाला, तांदूळ व काजू साठवण्यासाठी वापरली जात होती.

Vengurla Dutch Factory | Dainik Gomantak

इतिहास

या वखारीला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरक्षा पुरवली होती आणि १६६३ साली स्वतः भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो, ज्यामुळे तिचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.

Vengurla Dutch Factory | Dainik Gomantak

मालाची आयात-निर्यात

त्या काळात अरब व्यापारीही या वखारीत मालाची आयात-निर्यात करण्यासाठी येत असत, त्यामुळे वेंगुर्ले बंदर हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते.

Vengurla Dutch Factory | Dainik Gomantak

तळघर अजूनही भक्कम

सध्या वखारीचे दोन मजले मोडकळीस आले असले तरी तळघर अजूनही भक्कम उभे असून प्रत्येक दगड इतिहासाची साक्ष देतो.

Vengurla Dutch Factory | Dainik Gomantak

पर्यटन

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून, डचांची एकमेव वखार वेंगुर्ले बंदरात असल्याने तिचे जतन आणि संवर्धन आवश्यक आहे.

Vengurla Dutch Factory | Dainik Gomantak

आकर्षक प्रदर्शन

वखारीत त्या काळातील आयात-निर्यात होणाऱ्या वस्तू, डचांचे पोषाख, पुतळे, तोफा व इतर ऐतिहासिक प्रतिकृती ठेवून आकर्षक प्रदर्शन उभारता येईल.

Vengurla Dutch Factory | Dainik Gomantak

डागडूजी

योग्य डागडूजी व संवर्धन केल्यास ही डच वखार एक भक्कम ऐतिहासिक पर्यटन केंद्र बनून स्थानिक पर्यटन व रोजगाराला चालना देऊ शकते.

Vengurla Dutch Factory | Dainik Gomantak

हिवाळ्यात घर ठेवा हिरवेगार!

Winter Plants | Dainik Gomantak
येथे क्लिक करा