Sameer Amunekar
स्वेटरचा कपडा शरीरात उष्णता अडकवतो, त्यामुळे घाम येऊ शकतो आणि घर्षणामुळे रॅशेस, खाज, लालसरपणा किंवा स्किन इंफेक्शन होऊ शकते.
झोपताना शरीर आपोआप टेंपरेचर रेग्युलेट करते. पण स्वेटरमुळे शरीराचे तापमान कृत्रिमरीत्या वाढते आणि नैसर्गिक प्रक्रिया व्यत्ययात येते.
जास्त घट्ट स्वेटर घातल्यास शरीरातील रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होत नाही, विशेषत: मान, खांदा आणि हाताच्या भागात.
जास्त उकडल्यास बेचैनी, घाम येणे आणि अस्वस्थता जाणवते. त्यामुळे डीप स्लिप मिळत नाही.
स्वेटरचे लोकर किंवा फायबर अस्थमा, डस्ट अॅलर्जी किंवा सायनस असणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते.
लोकर टोपी किंवा स्कार्फ घालून झोपल्यास डोक्याला घाम येतो, ज्यामुळे फंगल डॅन्ड्रफ वाढू शकते व केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
घामामुळे कपड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि यामुळे त्वचेसंबंधी संसर्गाची शक्यता वाढते.