Sameer Amunekar
दापोली हे थंड हवामान, दाट जंगलं आणि सुंदर बीचेस यामुळे ओळखलं जातं. मुरुड, हर्णे बंदर, पांढरी वाळू असलेले बीच, तसेच डॉल्फिन सफारी ही खास आकर्षणं येथे अनुभवू शकता.
स्वच्छ, नितळ पाणी असलेला समुद्र, शांत वातावरण आणि समुद्रकिनारी स्थित असलेलं भगवान गणपतीचं.prसिद्ध मंदिर. हिवाळ्यात येथे समुद्रकिनारी विश्रांती घेतल्यास मन प्रसन्न होऊन जातं.
सिंधुदुर्ग किल्ला, तोंड्यात विरघळणारं मालवणी खाद्य आणि स्वच्छ पारदर्शक पाणी! स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग आणि पॅरासेलिंगसाठी हे सर्वोत्तम ठिकाण.
गर्दीपासून दूर, शांत आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा शोधत असाल तर गुहागर परफेक्ट. येथे तुम्हाला स्वर्गीय सकाळी, सुरेख सुर्यास्त आणि कोकणी संस्कृतीचा अनोखा अनुभव मिळतो.
मोठ्या तलावासह ऐतिहासिक राजवाडा, कुंभारकाम आणि लाकडी खेळण्यांची परंपरा यामुळे सावंतवाडी वेगळीच ओळख राखते. हिवाळ्यातील हिरवाई आणि धुकं अनुभवण्यासाठी उत्तम.
जरी मॉन्सूनसाठी प्रसिद्ध असली तरी हिवाळ्यातही आंबोलीची सृष्टी रेशमी आणि स्वर्गीय भासते. व्ह्यूपॉइंट्स, धबधबे आणि निसर्ग सफरीसाठी उत्कृष्ट.
येथील किल्ला, लाइटहाऊस आणि विस्तीर्ण समुद्रदृश्यं हिवाळ्यात भन्नाट फील देतात. संध्याकाळी समुद्रावर पसरलेलं नारंगी प्रकाशाचं जादुई रूप पाहण्यासारखं!