Sameer Amunekar
गरम कपडे, सॉक्स, टोपी आणि हलकी स्वेटर नेहमी वापरा. तापमान अचानक घसरल्यास थंडीची झळ अधिक जाणवते, त्यामुळे लेयरिंग खूप महत्त्वाची.
सूप, दलिया, गरम दूध, हळदीचे दूध, रताळे, साजूक तूप यांसारखे गरम व पौष्टिक पदार्थ शरीराला ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती देतात.
विशेषतः सकाळी आणि रात्रीचे थंड वातावरण टाळा. बाहेर जाणे आवश्यक असल्यास गरम कपडे आणि मास्क वापरा.
हिवाळ्यात त्वचा कोरडी होते आणि सांधे दुखण्याची शक्यता वाढते. नियमित मॉइश्चरायझर आणि तेल मालिश फायदेशीर.
खूप गरम पाणी टाळा कारण ते त्वचा कोरडी करते. गारठा वाढल्यावर कोमट पाण्यानेच आंघोळ करा.
रोज 15–20 मिनिटे चालणे, स्ट्रेचिंग किंवा घरगुती हलका व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर सक्रिय राहते.
थंडीमुळे तहान लागत नसली तरी शरीरातील पाण्याची कमतरता होते. दिवसातून पुरेसे कोमट पाणी पिणे आवश्यक आहे.