Sameer Amunekar
निवती बीच हा कोकणातील सर्वात शांत आणि कमी गर्दी असलेला बीच मानला जातो. कपल्सना प्रायव्हसीसह निवांत वेळ घालवण्यासाठी हा परफेक्ट स्पॉट आहे.
येथे सूर्यास्ताची रंगछटा इतकी सुंदर दिसते की फोटो काढणे थांबवणेच कठीण जाते. रोमँटिक संध्याकाळीसाठी बेस्ट लोकेशन.
बीचलगत असलेला निवती किल्ला तुमच्या डेटला ऐतिहासिक आणि अॅडव्हेंचर टच देतो. वरून दिसणारा समुद्राचा नजारा मंत्रमुग्ध करतो.
कमर्शियलायझेशन कमी असल्याने बीच खूप स्वच्छ, नैसर्गिक आणि शांत आहे. निसर्गप्रेमी कपल्ससाठी स्वर्गच.
निवती बीचभोवती छोटे कोव्हज, खडक आणि फोटोजेनिक पॉइंट्स आहेत जे कपल फोटोग्राफीसाठी परफेक्ट.
परिसरात हलक्या-फुलक्या वॉटर अॅक्टिव्हिटीज, बोट रायडिंग आणि डॉल्फिन पॉईंट्सची मजा घेता येते. कपल अॅडव्हेंचर साठी उत्तम.
बीचजवळ होमस्टे आणि सी-फूड मिळणारी छोटी रेस्टॉरंट्स आहेत. शांत वातावरणात सीफूड डेट ही खासच होते.