Sameer Amunekar
सकाळी उपाशीपोटी एक-दोन ताजे आवळे खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन C मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो.
दररोज सकाळी ताज्या आवळ्याचा रस थोडा मध घालून घेतल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि घशातील खवखव कमी होते.
जेवणासोबत आवळ्याची चटणी किंवा लोणचे खाल्ल्याने पचन सुधारते आणि शरीर उबदार राहते. ही पद्धत चवीदार आणि आरोग्यदायी आहे.
वाळवलेला आवळा पूड करून दररोज अर्धा चमचा मधासोबत घ्या. हे शरीरातील थकवा कमी करून प्रतिकारशक्ती वाढवते.
मुलांना आवळा द्यायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आवळा कँडी किंवा मुरंबा. हे स्वादिष्ट असून शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये पुरवतात.
आवळा नियमित खाल्ल्याने त्वचेचा ग्लो टिकतो, केस मजबूत होतात आणि थंडीच्या काळात शरीर सुदृढ राहते.