Sameer Amunekar
मुलं काही सांगतात तेव्हा लक्षपूर्वक ऐका. त्यांच्या भावना समजून घेतल्याने त्यांना वाटतं की त्यांचं मत महत्त्वाचं आहे.
१०-१५ मिनिटं का होईना, पण रोज फक्त मुलांसाठी राखून ठेवा. मोबाईल, टीव्हीपासून दूर राहून!
“छान केलंस!” एवढंच नाही, तर “तू खूप प्रयत्न केला, मला अभिमान वाटतो” असं सांगा. त्याने आत्मविश्वास वाढतो.
चुका हे शिकण्याचं साधन आहे. ओरडण्याऐवजी, काय सुधारता येईल हे शांतपणे समजवा.
खेळामध्ये पालकही सहभागी झाले, की मुलांशी नातं अधिक घट्ट होतं. खेळताना हसणं हे सर्वोत्तम थेरपी आहे.
नियम म्हणजे शिक्षा नव्हे. मुलांना सांगताना कारण समजावून द्या, तेव्हा ते सहज स्वीकारतात.
हे तीन शब्द मुलांचं आत्मविश्वासाचं सर्वात मजबूत आधारस्तंभ आहेत. ते जितकं ऐकतात, तितकं सुरक्षित आणि आनंदी वाढतात.