Sameer Amunekar
खजूरमध्ये नैसर्गिक साखर, कार्बोहायड्रेट्स आणि आयर्न असते. थंडीत शरीराला उष्णता व ताकद देण्यासाठी रोज 2 खजूर खूप उपयोगी ठरतात.
खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने सर्दी, खोकला, ताप यांसारख्या हंगामी आजारांपासून संरक्षण मिळते.
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर असल्यामुळे थंडीत होणाऱ्या सांधेदुखीपासून आराम मिळतो.
फायबर मुबलक असल्याने पोट साफ राहते. थंडीत जड जेवणानंतर खजूर खाल्ल्यास पचन सुरळीत होते.
खजूर शरीराला उष्णता देतात, त्यामुळे थंडीमुळे येणारी थकवा आणि कमजोरी कमी होते.
पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
खजूरमधील पोषक घटक त्वचा कोरडी पडू देत नाहीत आणि केस मजबूत, चमकदार ठेवतात.