Winter Bike Maintenance: हिवाळ्यात बाईकची विशेष काळजी घेणं गरजेचं! प्रत्येक रायडरने लक्षात ठेवाव्यात 'या' 7 महत्त्वाच्या गोष्टी

Sameer Amunekar

बॅटरीची नियमित तपासणी करा

हिवाळ्यात कमी तापमानामुळे बाईकच्या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बॅटरीची स्थिती, चार्जिंग आणि कनेक्शन नियमित तपासा.

Winter Bike Maintenance | Dainik Gomantak

इंजिन ऑइलकडे दुर्लक्ष करू नका

थंडीच्या दिवसांत इंजिन ऑइल घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनीने सुचवलेल्या योग्य ग्रेडचे इंजिन ऑइल वापरा आणि वेळेवर बदल करा.

Winter Bike Maintenance | Dainik Gomantak

टायरमधील हवा तपासा

थंडीमुळे टायरमधील हवेच्या दाबात बदल होऊ शकतो. त्यामुळे नियमितपणे टायर प्रेशर तपासा. योग्य हवा असल्यास रस्त्यावर बाईकचे नियंत्रण चांगले राहते.

Winter Bike Maintenance | Dainik Gomantak

बाईक सुरू केल्यानंतर थोडा वेळ थांबा

थंड वातावरणात इंजिन सुरू केल्यानंतर लगेच वेगाने बाईक चालवू नका. सुरुवातीला काही क्षण इंजिनला स्थिर होऊ द्या आणि त्यानंतर सावकाश प्रवास सुरू करा.

Winter Bike Maintenance | Dainik Gomantak

चेनची स्वच्छता आणि ल्युब्रिकेशन करा

बाईकची चेन नियमित स्वच्छ करा. त्यावर योग्य चेन ल्युब्रिकंट वापरा. यामुळे चेनचे घर्षण कमी होण्यास आणि तिचे आयुष्य वाढण्यास मदत होते.

Winter Bike Maintenance | Dainik Gomantak

ब्रेक आणि लाईट्स तपासा

हिवाळ्यात धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे बाईकचे ब्रेक, हेडलाईट, टेललाईट आणि इंडिकेटर्स व्यवस्थित सुरू आहेत की नाही, हे तपासा.

Winter Bike Maintenance | Dainik Gomantak

बाईक झाकून सुरक्षित ठिकाणी पार्क करा

थंडी, दव आणि ओलाव्यापासून बाईकचे संरक्षण करण्यासाठी शक्यतो ती झाकलेल्या जागेत पार्क करा. बाहेर पार्क करावी लागल्यास वॉटरप्रूफ कव्हरचा वापर करा. यामुळे बाईकच्या बाहेरील भागाचे संरक्षण होण्यास मदत होते.

Winter Bike Maintenance | Dainik Gomantak

त्वचेवर हवा आहे नैसर्गिक ग्लो? आहारापासून स्किन केअरपर्यंत महत्त्वाच्या टिप्स

येथे क्लिक करा