Sameer Amunekar
दररोज सनस्क्रीन लावा
सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरा.
दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करा
सकाळी आणि रात्री सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे धूळ आणि अतिरिक्त तेल दूर होण्यास मदत होते.
त्वचेला मॉइश्चरायझर लावा
त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर वापरा.
व्हिटॅमिन सीचा वापर करा
व्हिटॅमिन सी सीरम त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास आणि त्वचेचा रंग एकसमान दिसण्यास मदत करू शकते.
पुरेसे पाणी प्या
दिवसभर पुरेसे पाणी प्या. शरीरातील पाण्याची कमतरता टाळल्याने त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
फळे आणि भाज्या खा
आहारात संत्री, पपई, आवळा, गाजर आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
पुरेशी झोप घ्या
दररोज 7 ते 9 तास झोप घ्या. पुरेशी झोप त्वचेच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेला मदत करते.