Manish Jadhav
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप जीवाचं राण करत आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर (Congress Manifesto) केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी हल्लाबोल केला आहे.
शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल यांना विचारले की, देश शरिया कायद्यानुसार चालणार का? नुकताच भाजपने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भाजपने दावा केला आहे की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क असायला हवा.
शाह म्हणाले की, ''काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की, 'आम्ही पर्सनल लॉ ला महत्त्व देऊ.' मला राहुल गांधींना विचारायचे आहे की, जर तुम्ही पर्सनल लॉ पुढे केला तर आता हा देश शरियाच्या आधारावर चालेल का?
या देशात तुम्हाला कसलं संविधान हवंय? आम्ही समान नागरी संहिता (यूसीसी) आणू, सर्व पंथ आणि धर्माच्या लोकांसाठी एकच कायदा असेल, असे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे म्हटले आहे.''
शाह पुढे म्हणाले की, ''सुरक्षित देशासाठी, समृद्ध देशासाठी, गरिबांच्या कल्याणासाठी, अशा पक्षाला मतदान करा, जो आपल्या आश्वासनांवर काम करतो....काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर, भारतीय जनता पक्षाकडे लोकांचा कल आणखी वाढला आहे.