Simon Harris: आयर्लंडचं रुपडं पालटणार भारतीय वंशाचा नवा PM

Manish Jadhav

आयर्लंडचं सत्ताकारण

आयर्लंडचं रुपडं आता बदलू शकतं, कारण लिओ वराडकर यांच्या राजीनाम्यानंतर देशाची कमान आणखी एका भारतीय वंशाच्या नेत्याच्या हाती सोपवण्यात आली आहे.

Simon Harris | Dainik Gomantak

भारतीय वंशाचे सायमन हॅरिस

सत्ताधारी फाइन गेल पक्षाने भारतीय वंशाच्या सायमन हॅरिस यांची पंतप्रधानपदी निवड केली आहे. 37 वर्षीय हॅरिस देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत.

Simon Harris | Dainik Gomantak

भारतीय वंशाचे लिओ वराडकर

याआधी भारतीय वंशाचे लिओ वराडकर हे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. गेल्या महिन्यात त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यापासून हॅरिस पंतप्रधान होऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात होती आणि तसंच झालं.

Leo Varadkar | Dainik Gomantak

हॅरिस यांच्या समर्थनार्थ

मंगळवारी आयर्लंडच्या संसदेत हॅरिस यांच्या समर्थनार्थ 88 मते पडली. त्यांना युतीच्या पाटर्नर फियाना फेल आणि ग्रीन पार्टी तसेच अनेक अपक्ष खासदारांचा पाठिंबा मिळाला.

Simon Harris | Dainik Gomantak

PM मोदींनी अभिनंदन केले

आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान झाल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायमन हॅरिस यांचे अभिनंदन केले. "आम्ही आमच्या ऐतिहासिक संबंधांना खूप महत्त्व देतो जे लोकशाही मूल्यांवरील सामायिक विश्वासावर आधारित आहेत"

PM Narendra Modi | Dainik Gomantak

राजकारणात सक्रिय

सायमन हॅरिस लहानपणापासूनच राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी लवकरच एक समर्पित राजकारणी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी पक्षांतर्गत विविध भूमिका बजावल्या.

Simon Harris | Dainik Gomantak

कोविड काळात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली

हॅरिस यांनी 2016 ते 2020 च्या मध्यापर्यंतच्या महत्त्वपूर्ण कालावधीत आयर्लंडचे आरोग्य मंत्री म्हणून काम केले, जिथे त्यांनी COVID काळात महत्त्वाची भूमिका बजावली.

Simon Harris | Dainik Gomantak

हॅरिस यांच्या करिअरवर एक नजर

हॅरिस वयाच्या 16 व्या वर्षी फाइन गेल पार्टीत सामील झाला. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ते काउंटी कौन्सिल बनले. 2011 मध्ये ते वयाच्या 24 व्या वर्षी खासदार म्हणून निवडून आले होते.

Simon Harris | Dainik Gomantak
Chinese Student | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी