गोमन्तक डिजिटल टीम
वास्कोचे भाजी मार्केट तुम्हाला माहिती असेलच पण पावसाळ्यापासून श्रावणाच्या अखेरपर्यंत इथे रानावनातून येणाऱ्या खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
मान्सूनमध्ये गोव्याच्या जंगलातून येणाऱ्या रानभाज्यांनी वास्को मार्केट खचाखच भरून जातं.
पावसाळ्यात मिळणारे हे जंगली मशरूम अर्थात अळंबी चवीला खास असते. खास गोवन मसाल्यांसह याची भाजी जेवणाची रंगत वाढवते.
ही भाजी दिसायला कारल्यासारखी असली तरी या भाजीला स्वतःची अशी वेगळी चव आहे. पावसाळ्यात ही भाजी खाण्याची मजाच वेगळी आहे.
गोमंतकीयांच्या स्वयंपाकघरात पावसाळ्यात हि भाजी नक्कीच दिसते. कोवळ्या आकूरची भाजी फार चविष्ट लागते.
ताज्या कोवळ्या बांबूचा आस्वाद घेणे हे खरंच एक स्वर्गसुख आहे. बाजारात हे घेण्यासाठी फार झुंबड उडते.
पावसाळी हंगामात उपलब्ध असणाऱ्या अशा अनेक भाज्या या मार्केटमध्ये उपलब्ध असतात. या प्रकृतीसाठी चांगल्या असतात.
काही गावांमध्ये अशा विविध भाज्या गोळा करणे हा हंगामी व्यवसाय आहे. रहिवासी भाजीपाला गोळा करून थेट बाजारपेठेत किंवा व्यापाऱ्यांना विकतात.
खळाळता धबधबा आणि फेसाळणारा समुद्र एकत्र येणारे 'हे' जादुई ठिकाण..