गोमन्तक डिजिटल टीम
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्यात निसर्गाच्या चमत्काराने नटलेली अनेक ठिकाणे आहेत. असेच एक अद्भुत ठिकाण आज आपण पाहू.
गोव्यातील काबो दि रामा हा ऐतिहासीकदृष्ट्या महत्वाच्या असलेला किल्ल्यापासून जवळच हे जादुई ठिकाण आहे जिथे धबधब्याच्या प्रवाह समुद्राला मिळतो.
हा धबधबा म्हणजे निसर्गाच्या कोंदणात बसवलेले एक रत्न आहे. याला 'शिव' धबधबा असेही म्हणले जाते.
इथे पोहोचल्यावर तुम्हाला पहिला आश्चर्याचा धक्का बसेल म्हणजे धबधब्याच्या पाण्याची इन्फिनिटी पूलासारखी झालेली रचना आणि मागे अथांग समुद्र.
धबधब्याचे पाणी समुद्रात जाऊन मिळते हे स्वप्नवत दृश्य प्रत्यक्षात पाहणे ही या ठिकाणाची खासियत आहे.
समुद्र, धबधबा, ओबडधोबड खडक आणि हिरव्यागार जंगलाने नटलेली ही जागा तुम्हाला अनोखी शांतता मिळवून देईल.
या ठिकाणाकडे जाणारी वाट तितकीच सुंदर आहे. आसपासचे जंगल, पक्षी आणि पाण्याच्या आवाजासोबत ही भ्रमंती समृद्ध अनुभव देऊन जाते.
शाश्वत शांततेचा अनुभव देणारे गोव्यातले 'हे' शिवमंदिर आपणास माहित आहे का?