Sameer Amunekar
वॉकिंगपूर्वी वॉर्म अप करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण वॉर्म अप तुमच्या शरीराला शारीरिक हालचालींसाठी तयार करते. वॉर्म अप का आवश्यक आहे हे जाणून घेऊया.
वॉर्म अप केल्यामुळे स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि त्यांची लवचिकता सुधारते, ज्यामुळे चालताना इजा होण्याचा धोका कमी होतो.
हळूहळू शारीरिक हालचाल वाढवली की हृदय आणि फुफ्फुसं यांची तयारी होते, त्यामुळे चालताना श्वास लागणे कमी होते.
वॉर्म अप करताना हात-पाय हलवणे, मांड्या वाकवणे, थोडं चालणं या हालचाली शरीराला चालण्यासाठी योग्य लय मिळवून देतात.
वॉर्म अपमुळे शरीरासोबतच मनही चालण्यासाठी सज्ज होतं. उत्साह वाढतो आणि मन एकाग्र होतं.
थेट चालायला सुरुवात केल्यास शरीर झटकन थकू शकतं, पण वॉर्म अप केल्यामुळे ऊर्जा स्तर संतुलित राहतो.