Akshata Chhatre
आपण दिवसभर फोनवर असतो; सोशल मीडिया, कॉल्स, गेम्स, व्हिडीओज पण कधी विचार केलात का, तुमच्या फोनलाही ब्रेकची गरज आहे?
सारखा सतत वापर होत राहिल्यामुळे फोनचं परफॉर्मन्स हळूहळू कमी होतं. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला एक साधी पण उपयोगी ट्रिक सांगणार आहोत
किमान आठवड्यातून एकदा तरी फोन रिस्टार्ट केला पाहिजे. फोन खूप वापरत असाल किंवा तो स्लो होत असेल, तर आठवड्यातून २-३ वेळा रिस्टार्ट करणं फायदेशीर.
पावर बटन दीर्घकाळ दाबा, रिस्टार्ट निवडा. काही फोनमध्ये नोटिफिकेशन बार मधूनही रिस्टार्ट मिळतो.
अॅप्स बॅकग्राऊंडमध्ये चालू राहतात आणि RAM भरतात. रिस्टार्ट केल्यावर RAM रिकामी होते, फोन वेगाने काम करतो. अॅप क्रॅशिंग, फ्रीझिंग यांसारख्या त्रुटी रिस्टार्टमुळे निघून जातात.
बॅकग्राऊंड अॅप्स बंद होतात, अनावश्यक बॅटरी वापर थांबतो. कॉल्स ड्रॉप होणं, इंटरनेट न लागणं यासारख्या त्रासावर उपाय. अॅप्स पटकन ओपन होतात, फोन हँग होत नाही अनुभव अधिक चांगला होतो.