Akshata Chhatre
अश्वगंधा ही एक प्राचीन आयुर्वेदिक औषधी आहे, जी शरीर, मन आणि मेंदू साठी फायदेशीर मानली जाते.
अश्वगंधा कॉर्टिसोल हार्मोनचं प्रमाण कमी करतं, त्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते.
दररोज अश्वगंधा सेवन केल्यास इम्युनिटी सुधारते, सर्दी-खोकल्यासारखे आजार लांब राहतात.
झोप न येणं किंवा सतत जागं राहणं? अश्वगंधा खाल्ल्याने झोप सुधारते आणि झोप लवकर लागते.
अश्वगंधा रक्तदाब नियंत्रित ठेवतो, रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करतो. हृदयाचे रक्षण करणारा हे एक नैसर्गिक टॉनिक आहे.
दूधाबरोबर अश्वगंधा चूर्ण घेण्याचा अनेकवेळा सल्ला दिला जातो, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच अश्वगंधाचा वापर करावा.