Akshata Chhatre
सध्या बाहेर उकाडा बराच वाढला आहे आणि या उकाड्याचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत असतो, मग लहान मुलांना या उकाड्यापासून कसं सुरक्षित ठेवावं याचा काही विचार केला आहे का?
लहान मुलांना बाहेर खेळण्याची खूप इच्छा असते आणि त्यात काहीच गैर नाही, पण मग वाढलेल्या उकाड्याचं काय? चला काही अशा गोष्टी जाणून घेऊया ज्यामुळे तुमची मुलं सुरक्षित राहतील.
एक म्हणजे मुलांना भरपूर पाणी प्यायला द्या, मुलांना खेळण्याच्या आणि बागडण्याच्या नादात पाणी पिण्याचं भान राहत नाही.
लहान मुलांना ११ ते ४ च्या दरम्यान बाहेर खेळू देऊ नका. यावेळी उन्हाची प्रखरता अधिक असते आणि मुलांना त्रास होऊ शकतो.
गरमीच्या दिवसांत मुलांना हलके आणि कॉटनचे कपडे वापरायला द्या. बाहेर पडताना त्यांना किमान एक टोपी किंवा छत्री सोबत ठेवायला सांगा.
मुलं जर का डोकेदुखीची तक्रार करत असतील किंवा सतत थकवा जाणवत असल्याची तक्रार करत असतील तर वेळ न दवडता त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा.