Sameer Amunekar
किवी हे एक अत्यंत पौष्टिक फळ आहे ज्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात. या वेबस्टोरीमध्ये किवी खाण्याचे काही मुख्य फायदे दिले आहेत.
किवीमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
किवीमध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असतो, त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन सुधारते.
किवीतील व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचे पोषण होते, आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
किवीमध्ये पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.
किवीमध्ये लुटीन (Lutein) आणि झिअॅन्थिन (Zeaxanthin) असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.