पावसाळा आला, काळजी घ्या! लहान मुलांच्या आरोग्यासाठी 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा

Sameer Amunekar

पावसाळ्यात लहान मुलांची काळजी घेणे खूप गरजेचे असते, कारण या काळात हवामानातील बदल, दमटपणा आणि संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढते.

Monsoon health tips for kids | Dainik Gomantak

कपड्यांची योग्य निवड

मुलांना सुकं, कोरडं आणि गरम ठेवण्यासाठी सूती किंवा हलकी उबदार वस्त्रे घालावीत. भिजलेले कपडे त्वरीत बदलावेत. पावसात बाहेर जाताना रेनकोट किंवा छत्रीचा वापर करावा.

Monsoon health tips for kids | Dainik Gomantak

आहार

उकडलेले पाणी किंवा फिल्टर केलेले स्वच्छ पाणीच प्यायला द्यावे. घरचेच ताजे आणि पौष्टिक अन्न द्यावे. थंड व बाहेरचे खाद्य टाळावे (जसे की गोलगप्पे, भजी इ.)

Monsoon health tips for kids | Dainik Gomantak

सर्दी-खोकल्यापासून संरक्षण

थोडीशी सर्दी झाल्यास घरगुती उपाय करावेत (जसे की हळद दूध, आल्याचा रस). गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Monsoon health tips for kids | Dainik Gomantak

त्वचेची व केसांची देखभाल

त्वचेवर पुरळ होऊ नये म्हणून रोज स्नान करणे गरजेचे. भिजल्यानंतर त्वरीत कोरडं करावं.

Monsoon health tips for kids | Dainik Gomantak

ताप

ताप, उलटी, अतिसार, त्वचेवर पुरळ अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर उपचार करणे महत्त्वाचे.

Monsoon health tips for kids | Dainik Gomantak
Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा