Sameer Amunekar
ब्रश केल्यानंतर दातांचा इनेमल थोडा वेळ सॉफ्ट राहतो. अशा वेळी गरम चहा प्यायल्यास इनेमलचा झपाट्याने नाश होऊ शकतो.
चहामध्ये टॅनीन असतो, जो दातांवर डाग निर्माण करतो. ब्रशनंतर लगेच चहा घेतल्यास दात सहजपणे पिवळे पडू शकतात.
ब्रश केल्यावर तोंडातील pH बॅलन्स बदलतो. त्यात चहा पिल्यास अॅसिडिटी वाढते, जी दातांच्या आरोग्यास हानिकारक ठरते.
ब्रशनंतर दात थोडे संवेदनशील असतात. गरम किंवा गोड चहा प्यायल्याने थोडीशी चिवचिव किंवा वेदना होऊ शकते.
ब्रश केल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास तोंडात पुन्हा साखर व अॅसिड निर्माण होतो आणि ब्रशिंगचा परिणाम कमी होतो.
इनेमल मऊ असताना गरम पेय घेतल्यास उष्णतेमुळे सूक्ष्म क्रॅक्स येण्याची शक्यता असते.
चहा घेतल्यावर लगेच पुन्हा ब्रश न केल्यास तोंडात दुर्गंधी टिकते. ब्रशनंतर काही वेळ चहा टाळल्यास ताजेपणा जास्त वेळ टिकतो.