Sameer Amunekar
लवंगमध्ये असणारे युजेनॉल पाचनशक्ती वाढवते, अपचन आणि गॅसच्या समस्येतून आराम मिळतो.
लवंग अँटीबॅक्टेरियल आणि अँटीवायरल घटकांनी भरलेली असल्यामुळे गळा दुखणे, खवखव आणि खोकल्यात आराम मिळतो.
लवंगमधील अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण मिळते.
लवंगाचा नैसर्गिक तेल दातदुखीवर गुणकारी असून तोंडातील दुर्गंधीही दूर करते.
लवंग रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते, डायबेटिक लोकांसाठी फायदेशीर.
लवंगमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सांधेदुखी आणि स्नायूंच्या सूजेत आराम देतात.
लवंगातील अँटीबॅक्टेरियल गुण त्वचेवरील फोड, पुरळ आणि डाग कमी करण्यात मदत करतात.