Sameer Amunekar
अपुरी किंवा खंडित झोप झाल्यास दिवसभर थकवा जाणवू शकतो. झोपेच्या वेळा नियमित ठेवा आणि ७-९ तासांची शांत झोप घ्या.
शरीराला आवश्यक पोषक तत्व (आयर्न, व्हिटॅमिन B12, प्रथिने, पाणी) कमी झाल्यास अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. संतुलित आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.
सतत मानसिक दडपणात राहिल्यास शरीर थकल्यासारखं वाटतं. ध्यान, योगा, किंवा रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरून मन शांत ठेवा.
कमी हालचाल किंवा व्यायामाचा अभाव असला तरीही थकवा येतो. हलका व्यायाम, चालणं किंवा स्ट्रेचिंग करा.
अॅनिमिया (रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणे), थायरॉईडची समस्या, मधुमेह, झोपेचा त्रास (स्लीप अॅप्निया) इत्यादीमुळेही थकवा जाणवू शकतो.
जास्त चहा, कॉफी, किंवा साखर घेतल्याने सुरुवातीला उर्जावान वाटते, पण नंतर थकवा येतो. त्याऐवजी नैसर्गिक ऊर्जादायक पदार्थ (फळे, नट्स) खा.