Sameer Amunekar
नवीन लोकांशी ओळख वाढवण्याऐवजी नेहमी स्वतःपुरते मर्यादित राहिल्यास नातं जुळण्याच्या संधी कमी होऊ शकतात.
प्रत्येक व्यक्ती परफेक्ट असावी अशी अपेक्षा ठेवल्यास योग्य जोडीदार मिळूनही नातं पुढे जाणं कठीण होऊ शकतं.
स्वतःबद्दल सतत नकारात्मक विचार केल्याने संवाद साधताना संकोच वाटू शकतो आणि त्याचा परिणाम नात्यांवर होऊ शकतो.
जुन्या नात्याचा अनुभव किंवा विश्वासघात सतत मनात ठेवला, तर नवीन नात्याला संधी देणं अवघड होऊ शकतं.
चांगल्या नात्याचा पाया म्हणजे मोकळा आणि प्रामाणिक संवाद. भावना व्यक्त न केल्यास गैरसमज वाढू शकतात.
छंद, करिअर, फिटनेस आणि व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष दिल्यास आत्मविश्वास वाढतो आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व तयार होतं.
रिलेशनशिपमध्ये असणं ही यशाची एकमेव व्याख्या नाही. योग्य व्यक्तीची वाट पाहणं आणि स्वतःला घडवणं तितकंच महत्त्वाचं आहे.