गोमन्तक डिजिटल टीम
असं म्हणतात की शाकाहारी खाण्यात काहीच पर्याय उपलब्ध नसतात. शाकाहारी खाणं म्हणजे वरण आणि भात किंवा चिकन शिवाय बनलेली बिर्याणी म्हणजे पुलाव.
पण यात कितीपत सत्य आहे? आज जाणून घेऊया....
मात्र हा दिवस का साजरा केला जातो? जगभरात एवढी शाकाहारी लोकं आहेत का? कारण आज आंतराष्ट्रीय व्हेजिटेरियन डे आहे.
आजच्या दिवशी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. 1977 मध्ये नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीने या दिवसाची सुरुवात केली.
1978 मध्ये आंतरराष्ट्रीय शाकाहारी संघाने याला मंजुरी दिली.
जगभरात २२% लोकं शाकाहारी आहेत आणि सर्वात मोठा आकडा हा भारतात पाहायला मिळतो. गोव्यात मात्र ८८% लोकं मांसाहारी आहेत.
भारतात एकूण ३९% लोकं शाकाहारी आहेत. भारताशिवाय मेक्सिको, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अर्जंटिना या देशांमध्ये सुद्धा शाकाहारी लोकं आढळतात.