Manish Jadhav
संयुक्त अरब अमिराती हा देश आता जगभरातील करोडपतींची राजधानी बनत चालला आहे.
जगातील विविध देशांतील करोडपती संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) स्थलांतरित होत आहेत. पण असं का होत आहे? करोडपतींना हा देश इतका का आकर्षित करतोय? या सर्व प्रश्नांची उत्तरे या वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत...
संयुक्त अरब अमिरातीची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कच्च्या तेलावर आधारित आहे. पण गेल्या काही वर्षांत, UAE ने तेलावरील फोकस हटवून पर्यटन, गुंतवणूक आणि स्पोर्ट कॅपिटलवर लक्ष केंद्रित केले आहे.
यूएई आता जगातील सर्वाधिक करोडपतींची पहिली पसंती बनत चाललयं. हे सलग तिसरे वर्ष आहे जेव्हा जगभरातून सर्वाधिक करोडपती युएईला पोहोचले. 'द हेन्ली अँड पार्टनर रिपोर्ट'चा अंदाज आहे की, 2024 च्या अखेरीस 6700 करोडपती UAE मध्ये स्थलांतरित होऊ शकतात.
युएईला करोडपती येण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिथे इन्कम टॅक्स झिरो आहे. श्रीमंतांना गोल्डन व्हिसाची सुविधा मिळते. त्यामुळे इथे करोडपतींना त्यांचा व्यवसाय करणे सोपे झाले आहे. या कारणांमुळे करोडपतींची पहिली पसंती युएई बनत चालले आहे.
UAE व्यतिरिक्त अमेरिका हा दुसरा करोडपतींची पसंती असलेला देश आहे. 2024 च्या अखेरीस येथे 3800 करोडपती येण्याची शक्यता आहे.
सिंगापूरचे लोकेशन संयुक्त अरब अमिरातीसारखेच आहे. करोडपतींचा तिसरा सर्वात आवडता देश आहे.
याशिवाय, कॅनडा यामध्ये चौथ्या स्थानी आहे. या वर्षाच्या अखेरीस 3200 करोडपती कॅनडामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
कॅनडानंतर ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानी आहे. 2500 करोडपती ऑस्ट्रेलियात पोहोचण्याची शक्यता आहे. इटली, स्वित्झर्लंड, ग्रीस आणि पोर्तुगाल यांसारख्या युरोपीय देशांचाही या यादीत समावेश आहे.