Manish Jadhav
गोव्यात दरवर्षी लाखो पर्यटक येतात. गोवा हे पर्यटकांसाठी खास डेस्टिनेशन बनलं आहे. एकदा तरी जीवाचा गोवा केला पाहिजे असे म्हटले जाते.
गोव्याला फिरायला जायचंय पण तसं बजेट नाहीये. काही हरकत नाही, आम्ही तुमच्यासाठी गोव्यातील टॉप 5 प्रसिद्ध हॉटेल्स घेऊन आलो आहोत आणि तेही तुमच्या बजेटमध्ये. जिथे तुम्ही 1000 ते 2000 रुपये खर्च करुन आनंदाने राहू शकता.
तुम्ही या हॉटेल्समधून समुद्रकिनाऱ्याचा सुंदर नजराना पाहू शकता. जिथे तुम्हाला इनडोअर गेम्स, रेस्टॉरंट आणि कॅफे देखील मिळतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे हॉटेल कपल फ्रेंडली आहेत.
हे हॉटेल अगदी बागा बीचपासून 1.7 किमी अंतरावर आहे. इथे तुम्ही सपशेल समुद्र किनारा पाहू शकता. तसेच, इथे तुम्ही स्विमिंग पूल आणि इनडोअर गेम्सचा आनंद घेऊ शकता.
हे हॉटेल मडगाव शहरात आहे, ज्यामुळे पर्यटकांना हे सोयीचे ठिकाण आहे. या हॉटेल्समधून तुम्ही समुद्रकिनाऱ्याचा सुंदर नजारा पाहू शकता.
अलागोआ रिसॉर्ट हे थंड आणि शांत परिसरात स्थित आहे, बेतालभाटी समुद्रकिनाऱ्यापासून हे रिसॉर्ट थोड्याच अंतरावर आहे. हे रिसॉर्ट हिरवाईने वेढलेले आहे. एकूणच दक्षिण गोव्यामध्ये तुमच्या स्टेसाठी Alagoa Resort हा उत्तम पर्याय आहे.
व्हॅलेंटाईन रिट्रीट हे हॉटेल कांदोळी बीचपासून फक्त 35 मिनिटांच्या अंतरावर आहे. इथे तुम्हाला शानदार सुविधांचा आनंद घेता येतो. विशेष म्हणजे हे हॉटेल तुमच्या खिशाला परवडते. इथे राहून तुम्ही गोव्यातील पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.
जोक्से हॉस्टेल वागतौर बीचपासून अगदी जवळ आहे. इथून तुम्ही लगेच बीचवर पोहोचू शकता. स्विमिंग पूल, इन-हाउस बार, स्नूकर आणि टेबल टेनिससारखे इनडोअर गेम्सचा देखील तुम्ही इथे आनंद घेऊ शकता.