Akshata Chhatre
भारतीय संस्कृतीत हिरव्या बांगड्या विवाहित स्त्रीचे सौभाग्य सूचित करतात. या रंगाला समृद्धी, आनंद आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं.
हिरव्या बांगड्या विवाहानंतर स्त्रियांनी घालाव्यात, असं मानलं जातं. त्या नवविवाहितेचं सौभाग्य, पतीचं दीर्घायुष्य आणि नात्याची नवी सुरुवात दर्शवतात.
हिरवा रंग म्हणजे निसर्ग, समृद्धी आणि उर्जेचं प्रतिक. बांगड्यांचा हा रंग स्त्रीला मानसिक स्थैर्य व शांतता देतो, असं मानलं जातं.
हिरव्या बांगड्यांचा रंग डोळ्यांना थंडावा देतो आणि मनाला प्रसन्न ठेवतो. त्यामुळे या रंगाचे आरोग्यदायी फायदेही आहेत.
श्रावण महिन्यात, हरितालिका व्रत, मंगळागौर यांसारख्या सणांमध्ये हिरव्या बांगड्यांना विशेष स्थान असतं. त्या स्त्रीच्या श्रद्धेचं प्रतीक मानल्या जातात.
आजही अनेक तरुण मुली हिरव्या बांगड्या फॅशन म्हणून वापरतात. त्यामुळे परंपरा आणि आधुनिक सौंदर्य यांचं सुंदर मिश्रण तयार होतं.