Akshata Chhatre
अभिनेता आमिर खानने वयाच्या ६० वा वाढदिवस साजरा करताना तिसऱ्या प्रेमात पडल्याची कबुली दिली.
त्यानंतर सोशल मीडियावर एक चर्चा सुरूये. खरंच महिलांना वयाने मोठे पुरुषच आवडतात का?
भारतच नव्हे तर जगभरातील अभ्यासकांना यापूर्वीही हा प्रश्न पडला होता आणि त्याबाबत काही रिसर्चही झाले होते. युरोपमध्ये 2024 मध्ये याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. यात 51% महिला, 49% पुरुषांनी सहभाग घेतला होता.
यात म्हटलंय की, महिला सुरुवातीला तिच्यापेक्षा वयाने मोठ्या पुरुषाला डेट करू शकते. तिला वयाने मोठे पुरुष आवडतील. पण जसं जसं महिलेचं वय वाढेल तिचे नातेसंबंधातील वय आणि इतर निकष बदलतात.
वय वाढतं तसं महिला समवयीन किंवा तिच्या पेक्षा वयाने लहान पुरुषाला डेट करु शकते. पुरुषाची आर्थिक स्थिती चांगली असेल, समाजातील प्रतिष्ठित चेहरा असेल तर तरुण मुलीला असा पुरुष आवडेल आणि पुढे जाऊन ते लग्न देखील करतील.
अगदी पन्नाशीतल्या रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावरील महिलाही सांस्कृतिक, सामाजिक पायंड्यानुसार वयाने मोठ्या पुरुषाला डेट करतात. पण हे चित्र देशांनुसार बदलते.
स्थैर्य, आरोग्य आणि भावनिकदृष्ट्या सक्षम जोडीदार हवा असल्याने पन्नाशीनंतर महिला तिच्यापेक्षा लहान पुरुषाला प्राधान्य देते.