Akshata Chhatre
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफीस गाजवतंय. महिनाभरात चित्रपटाने तब्बल ५०० कोटींचा गल्ला जमावलाय.
या चित्रपटात स्टंट करणारी तरुणी चक्क महाराष्ट्रातली आहे. या चित्रपटात मोगल सैनिक मराठा साम्राज्याच्या दिशेने कुच करतानाच एक प्रसंग दाखवण्यात आला आहे. अमानूष मोगल सैनिक गुरं चारायला घेऊन गेलेल्या तरुणीला जिवंत जाळतात.
या सीनमधील स्टंट साक्षी सकपाळ या मराठी तरुणीने केलाय.
हा प्रसंग अंगावर काटा आणतोच, पण क्रूर सैन्याने सर्वसामान्यांवर केलेले अत्याचार पाहून डोळे पाणावतात.
या दृश्यात झळकलेल्या साक्षी सकपाळचे कौतुक होतंय. शूटिंगदरम्यानं BTS सोशल मीडियावर व्हायरल होतंय.
एक सीन शूट करण्यासाठी जवळपास एक दिवस सर्वांनी मेहनत घेतली, असं साक्षीने म्हटलंय.
मी स्टंटसोबतच पहिल्यांदा अभिनय केला आहे, हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, या चित्रपटात संधी मिळाली, हीच गोष्ट मोठी आहे, असंही साक्षीने सांगितले आहे.