Sameer Amunekar
महिलांचे भावनिक रिस्पॉन्स लेव्हल पुरुषांपेक्षा जास्त असते, त्यामुळे त्यांना एकसुरी वातावरण लवकर कंटाळवाणं वाटू शकतं.
घर, नोकरी, कुटुंब आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या यामुळे महिलांना सतत वेगवेगळे काम करावे लागतात. एकाच गोष्टीत जास्त वेळ राहिल्यास त्यांना पटकन कंटाळा येतो.
महिलांना नैसर्गिकरित्या संवाद आणि नातेसंबंध जास्त महत्त्वाचे वाटतात. कमी सोशल इंटरॅक्शन असताना कंटाळा लवकर जाणवतो.
घरकाम, मुलांची काळजी किंवा नोकरीतील एकसुरीपणा यामुळे मानसिक ताजेपणा कमी होतो.
इतरांच्या गरजांमध्ये स्वतःच्या आवडीनिवडीसाठी वेळ न मिळाल्यास मन पटकन उदास आणि कंटाळलेले वाटू शकते.
संशोधनानुसार महिलांचा मेंदू भावनिक आणि संवेदनात्मक माहिती जलद प्रोसेस करतो, त्यामुळे मेंदूला नवं स्टिम्युलस लवकर हवं असतं.
मासिक पाळी, गर्भधारणा, रजोनिवृत्ती यांसारख्या टप्प्यांवर हार्मोन्समधील बदलांमुळे मूड आणि उत्साहावर परिणाम होतो, ज्यामुळे कंटाळा पटकन जाणवतो.