Akshata Chhatre
आपल्या शरीराचे तापमान साधारण ३७°C असते. जेव्हा आपण श्वास सोडतो, तेव्हा फक्त हवाच नाही, तर शरीरातील उष्णता आणि ओलावाही बाहेर येतो.
आपल्या फुफ्फुसात नेहमी ओलावा असतो. हा ओलावा श्वासावाटे बाहेर पडताना वायूच्या (Gas) रूपात असतो, जो उन्हाळ्यात दिसत नाही.
तोंडातून निघालेली गरम हवा (३७°C) जेव्हा बाहेरच्या थंड हवेला स्पर्श करते, तेव्हा ती अचानक गार होते.
विज्ञानाच्या भाषेत याला 'संघनन' म्हणतात. गारव्यामुळे हवेतील अदृश्य वाफेचे रूपांतर पाण्याच्या सूक्ष्म थेंबांमध्ये होते.
ज्या प्रक्रियेने आकाशात ढग तयार होतात, त्याच प्रक्रियेने तुमच्या तोंडातून पांढरी वाफ बाहेर येते. थोडक्यात, तो एक छोटासा ढगच असतो!
उन्हाळ्यात बाहेरील तापमान जास्त असते. शरीरातील गरम हवा बाहेर पडल्यावर तिला गारवा मिळत नाही, त्यामुळे वाफेचे थेंब बनत नाहीत.
बाहेरील तापमान जितके कमी, तितका हा पांढरा धूर जास्त स्पष्ट दिसतो. हे केवळ विज्ञानाचे एक साधे आणि सुंदर तत्व आहे.