Manish Jadhav
थंडीच्या दिवसांत उन्हाचा त्रास कमी जाणवतो, त्यामुळे बरेच जण सनस्क्रीन लावणे सोडून देतात. पण हिवाळ्यातही सनस्क्रीन लावणे त्वचेसाठी तितकेच महत्त्वाचे असते. कोरियन ब्युटी सिक्रेट्समध्ये त्वचेच्या रक्षणासाठी सनस्क्रीनला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते.
हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडते. कोरियन स्किन केअरनुसार, मॉइश्चरायझरसोबत सनस्क्रीन लावल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहते.
सूर्यकिरणांमुळे त्वचेतील कोलेजन नष्ट होते. कोरियन मुलींप्रमाणे तजेलदार त्वचा हवी असेल, तर रोज सनस्क्रीन लावणे अत्यंत गरजेचे आहे.
हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचा संवेदनशील बनते. अशा वेळी उन्हाच्या संपर्कात आल्यास त्वचेची होणारी जळजळ सनस्क्रीनमुळे टळते.
कोरियन ब्युटी रुटीनमध्ये घराबाहेर पडताना दर 3 ते 4 तासांनी सनस्क्रीन री-अप्लाय (पुन्हा लावणे) करण्यावर विशेष भर दिला जातो.
मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनमधून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळेही त्वचेचे नुकसान होते. हिवाळ्यात स्क्रीनसमोर जास्त वेळ असताना सनस्क्रीन उत्तम कवच ठरते.
नियमित सनस्क्रीनच्या वापराने त्वचेचा रंग एकसारखा राहतो आणि काळे डाग न पडता त्वचा कोरियन लोकांसारखी चमकदार व स्वच्छ बनते.