Akshata Chhatre
गुदगुली ही आपली इच्छा नसताना घडणारी गोष्ट आहे. मेंदूला काही समजण्यापूर्वीच शरीर प्रतिक्रिया देते आणि हसून नियंत्रण सुटते.
संशोधनानुसार, गुदगुली ही केवळ गंमत नाही तर नाती जोडण्याचे माध्यम आहे. अगदी उंदरांमध्येही गुदगुलीमुळे आनंदाची भावना दिसून आली आहे.
मान, पोट आणि बरगड्या हे शरीराचे सर्वात खुले आणि नाजूक भाग आहेत. गुदगुलीच्या निमित्ताने मेंदू या भागांच्या सुरक्षिततेची चाचणी घेत असतो.
आपला मेंदू आपल्या स्वतःच्या हालचालींचा अंदाज आधीच घेतो. 'अनपेक्षितता' नसल्यामुळे आपण स्वतःला गुदगुली करून हसवू शकत नाही.
आदिमानवाच्या काळात भाषा विकसित होण्यापूर्वी, आई-वडील आणि मुलांमधील प्रेम व्यक्त करण्यासाठी गुदगुली हाच मुख्य दुवा होता.
तुम्ही कोणाला तुमच्या जवळ येऊ देता आणि गुदगुली करू देता, हे संपूर्णपणे तुमच्या विश्वासावर अवलंबून असते. अनोळखी व्यक्तीची गुदगुली भीतीदायक ठरू शकते.
समूहातील तणाव कमी करण्यासाठी आणि एकमेकांवरील विश्वास वाढवण्यासाठी गुदगुली हा 'सोशल ग्लू' सारखा काम करतो, ज्यामुळे नाती घट्ट होतात.