Sameer Amunekar
पांढऱ्या रंगामुळे डाग, घाण, पाण्याचे डाग सहज दिसतात. त्यामुळे लोक स्वच्छतेकडे अधिक लक्ष देतात.
पांढरा रंग हा कोणत्याही बाथरूमच्या थीमशी जुळणारा असतो, त्यामुळे तो सौंदर्यदृष्ट्या देखील उठून दिसतो.
पांढरा रंग हा शांततेचे व स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो, म्हणून बाथरूममध्ये तो अधिक पसंत केला जातो.
सिरेमिक किंवा पोर्सलिन तयार करताना पांढऱ्या रंगाचे उत्पादन करणे सोपे असते आणि त्यावर ग्लेझिंग करणेही सोयीचे असते.
पांढऱ्या रंगाच्या बेसिनवर स्क्रॅचेस किंवा डाग दूर करण्यासाठी बाजारात सहज उपलब्ध क्लिनर वापरता येतात.
दीर्घ काळापासून वॉश बेसिन पांढऱ्या रंगातच उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची सवय बनली आहे व त्यामुळे मागणी कायम आहे.
पांढऱ्या रंगामुळे बेसिन किती स्वच्छ आहे हे स्पष्ट दिसते, त्यामुळे बॅक्टेरिया, बुरशी यांची वाढ टाळता येते.