Sameer Amunekar
१६६० साली विशाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरक्षित सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेने स्वराज्यासाठी दिलेला जीवत्याग हेच पावनखिंडचे महत्त्व.
सिद्दी मसूदच्या १००० सैन्याचा सामना करत, बाजीप्रभूंनी ३०० मावळ्यांसह थांबून युद्ध केलं. त्यांच्या बलिदानामुळेच शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले.
ही खिंड पूर्वीची घोडखिंड म्हणून ओळखली जात होती. बाजीप्रभूंच्या बलिदानामुळे ही "पावनखिंड" म्हणून ओळखली जाऊ लागली.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात, कोल्हापूरपासून सुमारे ५५ किमी अंतरावर वसलेली आहे.
पावनखिंडला कोल्हापूरहून खाजगी वाहन किंवा स्थानिक बसने जाता येते. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कोल्हापूर. पन्हाळा किंवा आजूबाजूच्या परिसरातील बसस्थानकातून पावनखिंडसाठी बसने जाता येतं.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच थंडीच्या दिवसात भेट द्यायला योग्य आहेत तसंच पावसाळ्यातही निसर्गसौंदर्याने खिंड खुलते पण वाटा ओलेसर असतात.
बाजीप्रभू देशपांडे यांचा विजयस्तंभ, स्मारक फलक, खिंडीतील युद्धस्थळ व ऐतिहासिक परिसर,निसर्गरम्य परिसर आणि निसर्गभ्रमंती